Punjab's famous singer Sardul Sikander dies
पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्यात किडनीच्या समस्येने ग्रस्त झाल्यानंतर सिकंदर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. हे ऑपरेशन यशस्वी झाले होते, परंतु त्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांचे प्रकृती खालावत गेली.
सरदुल सिकंदर यांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. त्यांचा पहिला अल्बम 1980 मध्ये आला होता. ‘रोडवेज द लारी’ असे या अल्बमचे नाव होते. यानंतर, त्यांनी बरेच अल्बम काढले. 1991 साली आलेला त्यांचा ‘हुस्ना दे मलको’ अल्बम जगभरात प्रसिद्ध झाला. या अल्बमच्या 5.1 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. गाण्यांशिवाय त्यांनी बर्याच चित्रपटांत अभिनय देखील केला. ‘जग्गा डाकू’ या पंजाबी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…