Delhi Woman Dies After Being Slapped By Son
नवी दिल्ली : दिल्लीत द्वारका परिसरात रागाच्या भरात मुलाने आपल्या वयोवृद्ध आईच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वृद्ध आईचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना CCTV मध्ये रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बिंदापूर पोलीस ठाण्यात एक फोन आला. एका महिलेचा इमारतीच्या मालकासोबत कार पार्क करण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यापूर्वीच हे प्रकरण मिटवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस पथक निघून गेले. मात्र काही वेळाने या प्रकरणावरून वृद्ध महिला अवतार कौर (७६), त्यांचा मुलगा रणबीर आणि सून यांच्यात वाद निर्माण झाला. त्याचवेळी रणबीरने त्याची आई अवतार कौर यांच्या कानशिलात जोरदार थप्पड लगावली. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या सूनेने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तात्काळ मुलाने आणि सूनेने अवतार कौर यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी अवतार कौर यांच्या 45 वर्षांच्या मुलाविरूद्ध बिंदापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…