महाराष्ट्र

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार असून, त्यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा (बियाणे, खते, औषधे इ.) मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.

अमरावती विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे (मो. क्र. ९६५७१०९८०९), पुणे विभागात सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे (मो. क्र. ७५८८५०९४९२), कोकण विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर (मो. क्र. ९४०४९५३५१८), छत्रपती संभाजीनगर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी शीतल कौदरे (मो. क्र. ९१७२३१९६३७), नागपूर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे (मो. क्र. ९६५७१०९८०९) आणि नाशिक विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर (मो. क्र. ९४०४९५३५१८) यांच्याशी फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास संबंधित हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago