महाराष्ट्र

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलाखत परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रती विद्यार्थी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन ‘बार्टी’ने केले आहे.

संघ लोकसेवा आयोगाने १७ एप्रिल रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला असून या निकालात राज्यातील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुलाखती पूर्वतयारीसाठी प्रवासखर्च, निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये एकरकमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. योजनेचा सविस्तर तपशील, जाहिरात व अर्जाचा नमुना ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पात्र उमेदवारानी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील NOTICE BOARD > UPSC CAPF Assistant Commandant Service-Personality Test Examination 2026 Financial assistance Scheme या लिंकवर क्लिक करावे.

अर्ज करण्यासाठी फॉर्म : 👉 https://www.barti.in/assets/noticeBoard/101-1777022669.pdf

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago