मुंबई

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समिती अध्यक्ष सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्राणी निवारा उभारणीसाठी योग्य जमिनीची सर्व संबंधित विभागानी संयुक्त पाहणी करून सर्वसमावेशक अहवाल प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष काकडे यांनी बैठकीत दिले.

बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विजय तुकाराम सावंत, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ कलीमपाशा पठाण, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ वाय. डी. आगरकर, देवनार पशुवधगृहाचे पशुधन विकास अधिकारी डॉ प्रसाद घोलप, पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.दामिनी खवसकर, कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गणेश थोरात, पोलीस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर, मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अरविंद तोडकरी, बोरीवली प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक समाधान महानकर आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर प्राणी निवारा उभारणीसाठी जागा निश्चितीच्या मुद्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या प्राण्यांसाठी निवारा उभारणीसाठी आवश्यक जमिनीच्या पाहणीसाठी यापूर्वी मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार मालाड येथील मालवणी परिसरातील जागेची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात आली. तसेच चेंबूर (पूर्व) आणि मुलुंड (पूर्व) येथील पर्यायी जागांचा प्रस्तावही चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर बोरीवली तहसीलदारांशी समन्वय साधून मुंबई उपनगरात योग्य मोकळ्या जागेचा शोध घ्यावा आणि जमिनीची संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश अध्यक्ष काकडे यांनी यावेळी दिले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची सुरक्षित वाहतूक, पशुवधगृहाची वैधता, प्राण्यांची वैद्यकीय तपासणी आदी सर्व बाबी काटेकोर पद्धतीने तपासण्याचे निर्देशही काकडे यांनी यावेळी दिले. प्राणी कल्याणाशी संबंधित विविध विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago