देश

दीप सिद्धूचा मृतदेह शवविच्छेदनानंतर देण्यात आला कुटुंबीयांच्या ताब्यात, लुधियानात होणार अंत्यसंस्कार

पंजाब : अभिनेता दीप सिद्धू याचा मंगळवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर दीप सिद्धूचा मृतदेह सोनीपतच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. सोनीपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दीप सिद्धूच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले आहे. दीप सिद्धू याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, लुधियाना येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

सोनीपाल पोलिसांनी दीप सिद्धूचे पोस्टमार्टम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तीन डॉक्टरांच्या पथकाने दोन डीएसपींच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दीप सिद्धू याचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे समर्थक मोठ्या संख्येने सोनीपत येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले होते. ज्या रुग्णवाहिकेतून दीपचा मृतदेह नेण्यात आला, त्या रुग्णवाहिकेवर समर्थक आणि नातेवाईकांनी पुष्पवृष्टी केली. एवढेच नाही तर नातेवाईक आणि समर्थकांनी दीप सिद्धू जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. पंजाबी अभिनेता, गायक आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धू याचा मृतदेह पंजाबमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्याच्या पार्थिवावर लुधियानामध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत.

दीप सिद्धू तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनातील एक प्रसिद्ध चेहरा होता. दीप सिद्धूला 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावरील हिंसाचारातही आरोपी करण्यात आले होते. दीप सिद्धू जामिनावर बाहेर होता आणि मंगळवारी दिल्लीहून पंजाबला परतत होता. सोनीपाल येथील कुंडली सीमेवर त्याची स्कॉर्पिओ ट्रकला धडकली. या अपघातात दीप सिद्धूचा मृत्यू झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago