क्राईम

भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, घटना उघडकीस आल्यानंतर…

पंजाब : पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे तंत्र मंत्राच्या नावावर एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पीडित मुलीच्या कुटूंबियांनी भोंदू बाबाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पठाणकोटच्या भदरोया येथील आहे, येथे एक भोंदू बाबा तंत्र मंत्र करीत असायचा. तेथील लोकांना फसवून तो त्यांच्याकडून पैसे उकळायचा. लोक अंधश्रद्धेला बाली पडून त्याच्याकडे समस्या घेऊन जायचे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना या भोंदूने सांगितले की मुलीवर तंत्र मंत्र करावे लागतील. त्यासाठी या भोंदूने मुलीला आपल्या घरी बोलावले आणि तिला एका वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 आरोपी 10 ते 12 वयाचे, सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यावर झाला खुलासा

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार सांगताच तिचे कुटुंबीय भोंदू बाबाकडे गेले आणि त्यांनी त्या बाबाला चांगलाच चोप दिला. या बाबाचा चोप देतानाच व्हिडिओ बनवून तो व्हायरलही केला. त्यानंतर मुलीच्या कुटूंबियांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी ढोंगी बाबाला अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी दविंदर प्रकाश यांनी सांगितले की, सध्या आरोपी भोंदू बाबाविरोधात POCSO कायद्यांतर्गत कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago