क्रीडा

बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला गैरवर्तनाची शिक्षा, पुढील चार सामन्यांसाठी बंदी

नवी दिल्ली : बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल व पंचांशी भांडण केल्याबद्दल शिक्षा झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्याच्यावर ढाका प्रीमियर लीगच्या पुढील चार सामन्यांसाठी बंदी घातली होती. यासंदर्भात मंडळाने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नाही.

मोहम्मदान स्पोर्टिंग क्लब क्रिकेट समितीचे अध्यक्ष मसूदुझमान यांनी शनिवारी क्रिकबझला सांगितले की, “आम्हाला अद्याप कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नाही, परंतु आम्हाला समजले आहे की पंच समितीने शाकिब अल हसनवर चार सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे.” याची पुष्टी करताना ते म्हणाले की, अशा स्टार खेळाडूने असे वर्तन का केले, याची माहिती मिळवण्याचे आवाहन आम्ही बीसीबीकडे करू.

शुक्रवारी शाकिबने मैदानावरील सर्व मर्यादा ओलांडल्या. शाकिब डीपीएलच्या एका सामन्यात मोहम्मदान स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. अबानी लिमिटेड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने मुशफिकुर रहीम विरूद्ध एलबीडब्ल्यूची अपील केली. पण पंचांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि फलंदाजाला आउट दिले नाही. यामुळे चिडलेल्या शाकिबने स्टंपला लाथ मारली. यानंतर सामना स्थगित करण्यात आला. त्यानंतर शाकिब आणखीनच संतापला आणि त्यानें पंचजवळ जाऊन तिन्ही स्टंप उखडून खेळपट्टीवर फेकले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शाकिबने त्याच्या वागण्याबद्दल माफी मागितली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago