'Yas' can turn into a cyclonic storm, preparations for rescue on east coast start
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार होणारे वादळ आज चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊ शकते. जर ते चक्रीवादळात रूपांतरित झाले, तर त्याचे नाव ‘यास’ असेल. ओमानने चक्रीवादळाचे नाव निश्चित केले आहे. पूर्व किनाऱ्यावर सुरक्षा आणि बचावाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगाल आणि ओडिसाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसेल. तर अंदमान निकोबार आणि पूर्व किनारपट्टीच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुराचा धोका देखील उद्भवू शकतो. ओडिसा सरकारने वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या 30 ते 40 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तटरक्षक दल, आपत्ती निवारण दल (DRT), इन्फ्लाटेबल बोट्स, लाइफबॉयज आणि लाइफजेकेट्स यांच्यासह डॉक्टरांची पथके आणि ऍम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आले आहेत. बंदर प्राधिकरणे, ऑईल रिग ऑपरेटर, शिपिंग मत्स्यव्यवसाय अधिकारी आणि मच्छीमार संघटना यांना चक्रीवादळाविषयी माहिती देण्यात आली आहे. पूर्वेकडील किना-यावर मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. तटरक्षक दल डोर्नियर विमान आणि जहाजे समुद्रात काम करणाऱ्या मच्छीमारांना हवामानाची माहिती देत आहेत. याव्यतिरिक्त, त्यांना जवळच्या बंदरात परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ICG ने जवळील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बंदरांवर उपस्थित असलेल्या लोकांची माहिती ठेवण्याचे आवाहन केले आहे.
ICG प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरातील हवामानावर निरंतर नजर ठेवली जात आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर ICG रिमोट ऑपरेटिंग स्टेशन (ROS) च्या मदतीने अलर्ट पाठविले जात आहे.
केंद्राने राज्यांसाठी जारी केल्या गाईडलाईन्स :
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…