मनोरंजन

दुःखद : प्रसिद्ध राम-लक्ष्मण जोडीमधील संगीतकार लक्ष्मण यांचे निधन

नागपूर : प्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण जोडीमधील लक्ष्मण यांचे नागपूर येथे निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचाही समावेश आहे.

लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील आहे. ते विशीमध्ये नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. तसेच दादांनी या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर सुरेंद्र हेंद्रे यांचे किडनीच्या आजाराने निधन झाले. पण विजय पाटील यांना लक्ष्मण नावाने संगीत देणे योग्य वाटले नाही. त्यानंतर त्यांनी राम लक्ष्मण याच नावाने अनेक सिनेमांना संगीत दिले.

‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक मराठी सिनेमे आणि त्यातील अप्रतिम गाणी त्यांनी संगीतबद्ध केली. फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सुपरहिट गाणी दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’ चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण रुढच झाले होते. आणि ते यशस्वी देखील ठरले होते. ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago