देश

बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो.

सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा रामदेव ऍलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसत आहेत. ऍलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे, असं बाबा रामदेव बोलताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव ऍलोपॅथीच्या अपयशाबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारका, दिल्लीच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, “राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. कोरोना लढ्यात 1200 हून अधिक डॉक्टरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आहे, त्यांचा बाबा रामदेव यांनी अपमान केला आहे. देश कोरोनाच्या भयंकर संकटाला तोंड देत असताना बाबा रामदेव यांनी वापरलेल्या अवमानजनक आणि असंस्कृत भाषेमुळे समस्त डॉक्टर वर्गाच्या कामामध्ये नकारात्मकता येऊ शकते.

आपल्या जीवाचा विचार न करता देशातील डॉक्टर कोरोनाच्या या काळात झोकून देऊन रुग्णांची सेवा करत आहेत आणि हे स्वयंघोषित व्यापारी बाबा त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आणि तिरस्कार समाजात पसरवत आहेत. तसंच बाबा रामदेव यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो.

काही काळापूर्वी कोरोनावर औषध सापडल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटेनेने प्रमाणपत्र दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले होते.

Ford F 150 Lightning सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, बुकिंगसाठी ग्राहकांच्या रांगा, एकाच दिवसात 20,000 बुकिंग्स

ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago