Sambhaji Raje Reaction On Maratha Reservation verdict
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगितलं आहे. या निर्णयानंतर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळं कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. तसंच, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, कोरोनाची महामारी आहे, कोणीही उद्रेक करु नका. आपली लोकं जगली पाहिजेत. कोरोनामुळं संयम ठेवा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
समाजानं जगाला दाखवून दिलं आरक्षणाची किती गरज आहे. शांतताप्रिय मोर्चे काढले. जगाला आम्ही दाखवून दिलं होतं मोर्चे कसे असतात, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. आधीच्या सरकारनेही जोमानं बाजू मांडली होती. या सरकारनंही चांगली बाजू मांडली होती. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यावर आपण काही बोलू शकत नाही. बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं गेलं, महाराष्ट्राला दिलं गेलं नाही ही समाजाच्यावतीने दुर्दैवी बाब आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…