महाराष्ट्र

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्राप्त डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्वतःची भर घालून एकूण रुपये ३२,००० शैक्षणिक संस्थांना देणगी म्हणून देण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.

या पुरस्काराची मूळ रक्कम रुपये १५,००० इतकी असताना, त्यामध्ये स्वतःकडून अतिरिक्त रक्कम जोडून त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठा हातभार लावला आहे. स्वर्गीय आई वेणूताई व स्वर्गीय वडील निवृत्ती भाऊराव गिते यांच्या स्मरणार्थ प्रवरा माध्यमिक विद्यालय, शिबलापूर येथे रुपये ११,००० देणगी देण्यात आली.

यावेळी डॉ. गिते यांच्यासह प्राचार्य भारत दिवटे, सरपंच प्रमोद बोन्द्रे, माजी प्राचार्य आनंदाराव गिते, माजी प्राचार्य भिमराज बोन्द्रे, सुनील हिंगे सर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे तसेच इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कुटुंबातील अर्जुन गिते, संतोष गिते, रावसाहेब गिते, किरण गिते आणि अश्विनी गिते यांचीही उपस्थिती होती.

याशिवाय, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा परिषद शाळा, शिबलापूर यांनाही रुपये २१,००० देणगी देण्याची घोषणा डॉ. गिते यांनी केली.

पुरस्कारातून मिळालेली रक्कम स्वतःच्या उपयोगासाठी न ठेवता शिक्षणासाठी अर्पण करण्याचा निर्णय हा केवळ उदात्त विचार नव्हे, तर समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी दर्शवणारा आहे. डॉ. गिते यांच्या या कार्यामुळे शिक्षण क्षेत्राला बळ मिळणार असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सरपंच प्रमोद बोन्द्रे म्हणाले की, डॉ. गिते यांनी पुरस्काराची रक्कम स्वतःसाठी न वापरता शिक्षणासाठी अर्पण करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळते. त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल.

प्राचार्य भारत दिवटे सर म्हणाले की, डॉ. गिते यांची शिक्षणाविषयीची बांधिलकी आणि सामाजिक जाणीव खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी दिलेली ही देणगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार असून, त्यांच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

21 तास ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

22 तास ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

22 तास ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

6 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 आठवडे ago