मनोरंजन

‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई : अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चार दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, परंतु काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिलाषा पाटील काही दिवसांपूर्वी चित्रीकरणासाठी बनारसला गेल्या होत्या. परंतु त्यांना ताप आल्यामुळे त्या मुंबईला परतल्या, त्यानंतर कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु त्यांना वाचवता आलं नाही.

त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांची ‘बापमाणूस’ या मालिकेतील भूमिका लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या ‘छीछोरे’ या चित्रपटात नर्सची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी ‘बायको देता का बायको’, ‘पिपसी’, ‘तुझं माझं अरेंज’ अशा मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘गुड न्यूज’, ‘मलाल’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ अशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं.त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago