मनोरंजन

दुःखद : ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचे एडिटर अजय शर्मा यांचे कोरोनामुळे निधन

फिल्म एडिटर अजय शर्मा यांचे काल ४ मे रोजी रात्री निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. अजय शर्मा यांची प्रकृती ढासळत गेली आणि काळ त्यांची प्राणज्योत मालवली.

तापसी पन्नू यांच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे ते एडिटर आहेत. अजय शर्मा यांनी रश्मी रॉकेटच्या आधी जग्गा जासू, कारवां, लुडो, इंदू की जवानी, हायजॅक, प्यार का पंचनामा 2, क्रोक, तुम मिले आणि वेब सीरिज बंडिश बॅन्डिट्स यासारख्या प्रोजेक्ट मध्ये काम केलं आहे. याशिवाय अजय शर्मा यांनी बर्फी, ये जवानी है दिवानी, अग्निपथ, काय पो छे, लाइफ इन ए मेट्रो, गोरी तेरे प्यार में, आय हेट लव स्टोरीज आणि द डर्टी पिक्चर या चित्रपटात सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते.

अजय यांनी दिग्दर्शनात देखील हात अजमावळ होता. त्यांनी जॉली 1995 हा लघुपट दिग्दर्शित केला होता. अजय शर्मा एक अतिशय हुशार, प्रतिभाशाली आणि चांगले व्यक्ती होते.

अजय शर्मा यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. अनेकांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रिया पिळगावकर यांनी ट्विट केले की, ‘मी तुटलेली आहे. आम्ही आज अजय शर्मा यांना गमावलं. ते केवळ एक उत्तम संपादकच नव्हते तर अतिशय चांगले व्यक्तिमत्व होते. कशातच अर्थ उरलेला नाही.’

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago