मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पबाधितांना सदनिका देण्यासंदर्भात लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांना पीएपी (प्रोजेक्‍ट अफेक्टेड पीपल) सदनिका देण्यासंदर्भातील कार्यवाही गतीने सुरु केली जाईल. यामध्ये सहभागी असलेल्या विविध यंत्रणांची समन्वय समिती स्थापन केली जाईल आणि मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य श्रीमती विद्या ठाकूर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे माहुल येथे प्रकल्पबाधितांना पाठविण्यात येत नाही. तसेच त्यांना मूळ जागेच्या 5 किलोमीटर परिसरात जागा उपलब्ध असेल, तर तेथे निश्चितपणे पाठविले जाईल. प्रत्येक विभागात 55 हजार घरे बांधण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. याशिवाय, बांधकाम व्यावसायिकांकडून पुढील 3-4 वर्षात 2 हजार घरे प्रकल्पबाधितांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामांसाठी विभागनिहाय हे अधिकारी नेमले होते. ते अद्याप रुजू झालेले नाहीत. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, राम कदम, अतुल भातखळकर, अमिन पटेल, मनीषा चौधरी, यामिनी जाधव, डॉ.भारती लव्हेकर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे आदींनी सहभाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

2 महिने ago