पुणे

वाघोली गावाच्या विकासकामांबाबत लवकरच आढावा बैठक घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधा व विकासकामांबाबत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अशोक पवार यांनी पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील मूलभूत सोयीसुविधा संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले.

मंत्री सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगाव वाघोली या गावांकरिता सन 2023 ची लोकसंख्या विचारात घेता 56 एम. एल. डी. क्षमतेची समान पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून 31 एम. एल. डी. पाणी वाघोलीकरता उपलब्ध होईल.

वाघोलीत अस्तित्वात असलेली पाच एम. एल. डी. पाणीपुरवठा योजना, पीएमआरडीएमार्फत प्रगतीत असलेली 5 एम एल डी. पाणीपुरवठा योजना व पुणे मनपामार्फत हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून वाघोलीकरिता उपलब्ध होणारे 31 एम. एल. डी. पाणी असे सन 2025 पर्यंत एकूण 41 एल. डी. पाणी वाघोलीकरिता उपलब्ध होईल. सदस्य यांनी राहुल कुल, भीमराव तपकीर यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago