महाराष्ट्र

हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…

बारामती : कधी कधी भांडणाचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे दाखवणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतली. हा प्रकार पाहून आईला वाचवण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी देखील पाण्यात उडी घेतली, परंतु, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आईला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले. बारामतीमधील पिंपळी येथे शनिवारी (२९ मे) पहाटे तीन च्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीच्या भांडणातून ही घटना घडली आहे. पहाटे बारामती तालुक्यातील पिंपळी येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी या पती-पत्नी मध्ये भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात ही महिला आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीच्या पाण्याजवळ गेली आणि तिने खाणीच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2) हेदेखील आईच्या पाठोपाठ आले होते. आईने पाण्यात उडी घेतल्याचं पाहताच आईला वाचवण्यासाठी या दोन्ही मुलांनी एकापाठोपाठ पाण्यात उडी घेतली. याचवेळी पती अतुल यांनी पाण्यात उडी घेत पत्नीला पाण्याबाहेर काढले आणि वाचवले. पण यादरम्यान, त्यांच्या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट मन हेलावून टाकणारा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

21 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago