Tamil Nadu and Kerala govt appeals to postpone hearing on Maratha reservation
कोल्हापूर: एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे…अशा घोषणा देत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मी एकाच वेळी आठ-आठ खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे, त्यामुळे मला शिकवू नका… निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्याही क्षणी घेऊ शकता, त्यामुळे हिंमत असेल तर दोन दिवसात विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करा,असे त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.
कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. याची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. अजूनही राज्याने ती का केली नाही, हे कळत नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन करा म्हणून मागणी करूनही त्याबाबत निर्णय झाला नाही. निर्णय घ्यायची इच्छा असेल तर कोणत्याही क्षणी निर्णय घेता येतो पण तशी इच्छा या सरकारमध्ये दिसत नाही. मी आठ आठ खाती एकावेळी सांभाळली आहेत. त्यामुळे मला निर्णय घेण्याबाबत शिकवू नका, सरकारमध्ये हिंमत असल्यास अधिवेशनाची तारीख दोन दिवसात जाहीर करावी.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…