flight
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर AI-105 या विमानाने शुक्रवारी २.२० मिनिटांनी दिल्लीहून अमेरिकेच्या न्यूजर्सीसाठी उड्डाण केले. मात्र या विमानात वटवाघूळ आढळल्याने मोठी खळबळ उडाली. विमानाने उड्डाण केल्यानंतर जवळपास ३० मिनिटांनी पॅसेंजर एरियात वटवाघूळ आढळून आले. यामुळे हे विमान तात्काळ माघारी फिरवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. शुक्रवारच्या पहाटे ३.५५ मिनिटांनी या विमानाचे दिल्ली विमानतळार इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. यानंतर वन विभागाच्या पथकाने विमानातून मेलेले वटवाघूळ बाहेर काढले.
एअर इंडियाचे बोइंग 777-ER हे विमान दिल्ली-न्यूजर्सी दरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाते. ‘DEL-EWR AI-105 फ्लाइटसाठी दिल्ली विमानतळावर लोकल स्टँडबाय इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासाने विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानात वटवाघूळ असल्याची माहिती दिली. यानंतर इमर्जन्सी घोषित करून विमान माघारी फिरवण्याचा निर्णय घेण्यात आला. लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण वटवाघूळ कुठेच सापडले नाही. यानंतर वन्यजीव तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. त्यांनी विमानात धूर केला असता वटवाघूळ आढळले. पण तोपर्यंत ते मेलेले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर DGCA कडून चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी ग्राउंड सर्विस स्टाफचा निष्काळजीपणा समोर आला आहे. प्रत्येक उड्डाणापूर्वी विमानाची पूर्ण तपासणी केली जाते. सर्वकाही ठीक असल्यावरच उड्डाणाला परवानगी दिली जाते. विमानात वटवाघूळ येण्यास केटरिंग व्हेइकल जबाबदार असू शकतं, असा अंदाज एअर इंडियाच्या इंजीनिअरिंग सर्व्हिसने प्राथमिक अहवालात दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये प्रवाशांना जेवण दिलं जातं. हे जेवण बेस किचनमधून तयार होऊन येतं. ते विमानात लोड केलं जातं. व्हेइकलमध्ये यापूर्वीही उंदीर किंवा इतर छोटे जीव आढळून आले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…