क्राईम

संतापजनक : किरकोळ कारणावरून दलित मजुराच्या कुटुंबीयांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

छत्तरपूर : मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका दलित मजुराला शेतावर काम करायला बोलावल्यानंतर त्याला झाड तोडण्यास सांगितले, परंतु त्याने झाड तोडण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तो निसटून पळून गेल्यानंतर या गुंडांनी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलाही मारहाण केली. त्यानंतर त्या सर्वांचे अपहरण करून त्यांचा 4 दिवस छळ केला. त्यांनी या मजुराच्या गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार देखील केला.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. मुख्य आरोपी गावातीलच असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासोबतचे दोघे अगोदरच फरार झाले. मजुराच्या पत्नीनं पत्रकारांशी बोलताना तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. मात्र, तक्रारीत तिने याबाबत उल्लेख केलेला नाही. जर या महिलेने याबाबत लेखी माहिती दिली तर आरोपींवर बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या या गुन्ह्यातील आरोपींवर मारहाण करून इजा पोहोचवणे, अपहरण, अश्लीलता आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. याबाबत तिने तिच्या तक्रारीत उल्लेख केला आहे. राजनगर ठाणे प्रभारी पंकज शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

घटनेतील दलित मजुराच्या कुटुंबीयांना चार दिवस डांबून ठेवल्याची बाब पोलिसांना समजताच या सर्वांची सुटका करण्यात आली. बुधवारी ही संतापजनक घटना उघडकीस आली. कामावर आलेल्या 32 वर्षीय दलित मजुराने तब्येतीचे कारण सांगत आरोपींना शेतातील झाड तोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी या मजुरासह त्याच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत तीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य आरोपीला पकडले असून इतर दोघे अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 आठवडा ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

1 आठवडा ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

1 आठवडा ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

1 आठवडा ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

4 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

4 आठवडे ago