छत्रपती संभाजी नगर

औरंगाबाद पुन्हा हादरलं! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले दाम्पत्याचे मृतदेह, मुलगा फरार

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरले आहे. शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर कळंत्री यांची किरण कळंत्री ही दुसरी पत्नी होती. गजानगरमध्ये हे दाम्पत्य आपल्या मुलगा व मुलगीसोबत राहत होते. दोघांचे मृतदेह दोन दिवसांहून अधिक वेळ घरात पडून होते. आज परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा तपास केला असता घरातील खालच्या मजल्यावर एक आणि वरच्या मजल्यावर एक असे दोन मृतदेह पोलिसांना आढळले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते.

औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या, एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार

या दाम्पत्याच्या मुलीने दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी शामसुंदर यांनी तिला एसबी कॉजेलमध्ये सोडले होते. त्यानंतर दुपारी तिच्या भावाने तिला फोन केला आणि ते गावी जाणार असल्याचे सांगत तिला काकांच्या घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे आपण कॉलेजनंतर काकांच्या घरी गेलो, असे मुलीने सांगितले. मात्र, या घटनेनंतर शामसुंदर यांचा मुलगा आकाश कळंत्री फरार आहे. त्यामुळे त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

उपायुक्त दिपक हिरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल ढुमे, पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह फॉरेन्सिक टीम व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे.

थरकाप उडवणारा Video! सिंहासोबत मस्ती करणे पडले महागात, बोटाची हाडंच फक्त शिल्लक राहिली आणि…

भयंकर! तरुणाने दोन प्रेयसींसाठी केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

2 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago