गॅझेट्स

मस्तच! आता स्कॅम कॉलचा धोका दूर करणार TRAI चे ‘हे’ फिचर, जाणून घ्या…

TRAI Caller Id Feature : जर तुम्ही स्पॅम कॉल्समुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून एक आनंदाची बातमी आहे. TRAI आता Truecaller सारखी कॉलर आयडी सुविधा सुरू करणार आहे. ट्राय अशा संकल्पनेवर काम करत आहे, ज्याद्वारे एखाद्याच्या फोनवर कॉल करणाऱ्याचे नाव त्याच्या सिमवरील केवायसीद्वारे ओळखले जाईल.

स्पॅम कॉलच्या घटनांमध्ये होईल घट
Truecaller ऍप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला कॉल आल्यावर जरी कॉलरचे नाव कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये समाविष्ट नसले तरीही त्या व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसून येते. जरी Truecaller दाखवत असलेले नाव KYC वर आधारित नसले तरी हे ऍप वापरकर्त्याने स्वतः सेट केलेले नाव दाखवते. परंतु ट्रायच्या या नवीन फ्रेमवर्कला अंतिम रूप दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर वापरकर्त्याचे केवायसी नाव देखील दिसेल. तज्ञांच्या मते, हे वैशिष्ट्य आल्याने स्पॅम आणि फसवणूक करणाऱ्या कॉलची वाढती प्रकरणे कमी होतील.

वापरकर्ते फेक कॉल टाळण्यास सक्षम
दूरसंचार विभागाने ट्रायला यावर काम सुरू करण्यास सांगितले आहे. ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, येत्या काही महिन्यांत यावर सल्लामसलत सुरू होऊ शकते. ते म्हणाले की, ‘आम्हाला या प्रकरणाचा संदर्भ मिळाला असून लवकरच आम्ही कामाला सुरुवात करू. हे फीचर आणल्यानंतर यूजर्स फेक कॉल्स टाळू शकतील.

Truecaller कडून स्वागत :
Truecaller ने सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. Truecaller या ऍपच्या प्रवक्त्याने सांगितले की, संवाद सुरक्षित आणि प्रभावी बनवण्याच्या मोहिमेतील सर्व कामांचे आम्ही स्वागत करतो. स्पॅम आणि स्कॅम कॉलचा धोका दूर करण्यासाठी नंबरची ओळख खूप महत्वाची आहे. Truecaller च्या मदतीने आम्ही गेल्या 13 वर्षांपासून या महत्त्वाच्या मिशनवर काम करत आहोत. ते पुढे म्हणाले की, आम्ही ट्रायच्या या निर्णयाचे कौतुक करतो आणि आम्ही अशा उपक्रमांना पाठिंबा देत आहोत आणि भविष्यातही संवाद सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देत राहू.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago