Lion 'bites off' man's finger at Jamaica zoo in horrifying footage
इंटरनेटवर जमैका प्राणीसंग्रहालयातील एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिंहासोबत मस्ती करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. यात एका माणसाने सिंहाच्या पिंजऱ्याच्या आत आपला हात घातला आणि त्यानंतर सिंहाने त्याचे बोट चावून तोडून टाकले. विशेष म्हणजे, हे सगळं घडत असताना अनेकजण तिथेच उभे राहून या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जमैका प्राणीसंग्रहालयातील प्राणिसंग्रहालयाचा रक्षक (zoo keeper) सिंहाच्या पिंजऱ्यात वारंवार हात घालत होता. यावेळी सिंह गुरगुरत होता, त्याला हा प्रकार आवडत नव्हता. तरीही हा माणूस पुन्हा-पुन्हा पिंजऱ्यात सिंहासमोर हात नेत होता. यावेळी अचानक सिंहाने या व्यक्तीच्या मधल्या बोटाभोवती चावा घेतला. त्यानंतर ती व्यक्ती जिवाच्या आकांताने ओरडत सिंहाच्या जबड्यातून हात काढण्यासाठी धडपडत होती. या माणसाने त्याच्या डाव्या हाताने उजवा हात पकडून ठेवला आणि भिंतीवर पाय लावून पिंजऱ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नानंतर सिंहाच्या जबड्यातून हात बाहेर काढण्यात तरुण यशस्वी झाला खरा, मात्र यात त्याच्या हाताच्या बोटाची हाडंच शिल्लक राहिली आणि त्यावरील सर्व मांस सिंहाने ओढून घेतले.
एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितले कि, जेव्हा हे घडले तेव्हा मला वाटले की हा एक विनोद आहे. मला त्याचे गांभीर्य कळले नाही, कारण शो करणे हे त्यांचे काम आहे. मात्र, जेव्हा तो जमिनीवर पडला तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात आले की हे प्रकरण गंभीर आहे. त्यानंतर सर्वांना धक्का बसला. त्याची संपूर्ण त्वचा आणि त्याच्या बोटाचा पहिला सांधा निघून गेला होता.
प्राणीसंग्रहालयाने सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती नव्हती. परंतु जमैका सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्सद्वारे याची चौकशी केली जात आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…