buddhist monk chops off head with guillotine for good luck in afterlife
बँकॉक: थायलंडमध्ये थम्माकोर्न वांगप्रीचा असे नाव असलेल्या बौद्ध भिक्खूने स्वत:चे मुंडके कापून बळी दिला. ते ६८ वर्षांचे होते. उच्च अध्यात्मिक रुपात पुर्नजन्म घेण्यासाठी स्वत:चा स्वत: त्याग करणे हे सर्वोच्चपणाचे लक्षण असून नव्या जीवनात अध्यात्माच्या नव्या स्तरावर पोहचण्यासाठी आणि निर्वाणासाठी संधी मिळेल असा त्यांचा दावा होता. मागील पाच वर्षांपासून या विचित्र बलिदानाची तयारी करत होते, असे म्हटले जात आहे.
थम्माकोर्न वांगप्रीचा हे मागील ११ वर्षापासून उत्तर-पूर्व थायलंडमधील एका विहारात सेवा करत होते. त्यांचे पार्थिव शरीर सर्वात पहिल्यांदा त्याचा पुतण्या बुनचर्ड बुनरोड यांनी पाहिला. बुनरोड यांना वांगप्रीचा यांचे एक पत्रदेखील मिळाले. त्या पत्रानुसार, भगवान बुद्ध यांना आपले शरीर आणि आत्मा समर्पित करण्याची इच्छा असल्याचे म्हटले. असे केल्यामुळे भगवान बुद्ध पुढील जन्मात एक उच्च अध्यात्मिक रुपात जगात पुन्हा पाठवतील. मागील पाच वर्षांपासून याची तयारी करत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले.
थम्माकोर्न वांगप्रीचा यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आपण लवकरच या विहारातील सेवा बंद करणार असल्याचे याथम्माकोर्न वांगप्रीचा यांनी अन्य बौद्ध भिक्खूंना सांगितले होते. मात्र, नेमकं काय करणार आहोत याची काहीही माहिती दिली नव्हती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…