corona vaccine out of stock in mumbai
मुंबईः मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल येथील लसीचे डोस संपल्याने प्रवेशद्वाराजवळ आज (२० एप्रिल २०२१) लस संपल्याचे फलक झळकले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. तर, काही नागरिकांनी लसीकरणासाठी उन्हात रांगेत उभं असल्याचं चित्र होतं.
लसीकरण केंद्राचे प्रमुख राजेश डेरे म्हटले कि, कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात उपलब्ध होते. मंगळवार सकाळपासून ज्यांनी केंद्रावर नोंदणी केली त्या नागरिकांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळं पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जातील.
पुढे ते म्हटले कि, संध्याकाळपर्यंत आम्हाला कोव्हिशील्डचे डोस पुरवले जातील, असं सांगण्यात आलं आहे. जर डोस मिळाले तर पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल. कोव्हिशील्डच्या लसी संपल्यासंदर्भात काल रात्री उशीरा माहिती मिळाली.
मुंबईतील लस टंचाईचा मंगळवार हा सलग तिसरा दिवस ठरला आहे. सोमवारीच मुंबईत ३१ खासगी लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली. दिवसभराती लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्रही दिसून आले. सोमवारी केवळ ३५ हजार ३०९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १० हजार लोकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…