मनोरंजन

अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

अहमदाबाद : अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पायलच्या वडिलांनी 4-5 वर्षांपूर्वी या सोसायटीत घर विकत घेतले होते. पायल आणि सोसायटीतील सदस्यांमध्ये बराच काळापासून वाद सुरु होता. हे संपूर्ण प्रकरण अहमदाबादच्या सुंदरबन एपिटॉम सोसायटीमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायल 20 जून रोजी सोसायटीची सदस्य नसतानाही सोसायटीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत हजर होती. मात्र, त्यावेळी तिला बैठकीत बोलू दिलं नाही, त्यामुळे पायलने सदस्यांसोबत वाद घातला होता. सोसायटीतील सदस्यांबरोबर पायल छोट्याछोट्या गोष्टींवरून बर्‍याचवेळा वाद घालते, अशी देखील तक्रार आहे. पायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सोसायटीचे काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार, लहान मुले सोसायटीच्या आवारात खेळताना दिसल्यास त्यांच्याबरोबरही तिचे वर्तन चांगले नसते. ती त्यांच्याशी देखील भांडते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज ठाकरे हे कोत्या मनाचे नसून मोठ्या मनाचे व्यक्ती, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचे कौतुक

ठाणे : राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नाहीत, असे एकनाथ शिंदे…

2 तास ago

सातारा जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी-कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती

सातारा : लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस…

3 तास ago

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे आगमन

रायगड : भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी…

4 तास ago

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका): मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा…

2 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

जळगाव, दि. 4 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क…

2 दिवस ago

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म…

3 दिवस ago