ठाणे

राज ठाकरे हे कोत्या मनाचे नसून मोठ्या मनाचे व्यक्ती, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचे कौतुक

ठाणे : राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले असून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मनसेचे पदाधिकारी महायुतीचा प्रचार मनापासून करत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळेल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे, असे मी खात्रीने सांगू शकतो, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. सर्व कार्यकर्ते अतिशय मनापासून काम करत आहेत. एवढा कडक उन्हाळा असून देखील कार्यकर्ते मतदारांना केंद्रापर्यंत आणत असल्याचे मी पाहिले, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

उन्हामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मात्र, आता पुढील टप्प्यांमध्ये मतांचा टक्का वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पन्ना प्रमुख, गटप्रमुख सर्वांनी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी देखील मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मी राज्यात सर्व ठिकाणी फिरत आहे, काल कोल्हापूरमध्ये आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ‘दिल से’ कामाला लागले असल्याचे दिसून आले. राज ठाकरे मोकळ्या मनाचे व्यक्ती आहेत. जे मनात आहे तेच बोलतात. पोटात एक आणि ओठात एक असे त्यांना जमत नाही. त्यामुळे त्यांनी महायुतीचा प्रचार करायचा निर्णय घेतला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

10 तास ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

10 तास ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

11 तास ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

11 तास ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

11 तास ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

11 तास ago