सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी-कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती

सातारा : लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस म्हणून सातारा स्वीप कक्षाकडून राबविण्यात आला. आजच्या दिवशी जिल्ह‌्यामध्ये मा. याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ यांचे निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा व्यापक जनसंपर्क पाहता विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व अधिनस्त सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांची जिल्हयात एकाच दिवशी २००० पथकांची नियुक्ती करुन मतदार यादीनिहाय १०० % कुटुंबापर्यंत पोहचून जनजागृती करण्याच्या उद्देश्याने १ लाख कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. यावेळी मतदानाचे महत्व सांगण्यात आले तसेच मतदारांना मतदाना दिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचारी यांना सूचना केल्या.

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना तालुका निहाय भेटी देण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार सर्व अ‍धिकाऱ्यांनी नेमूण दिलेल्या तालुक्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष गृहभेटी करुन मतदान जनजागृती बाबत आवाहन केले.

तसेच सातारा जिल्हा परिषदेमार्फत गावातील ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांना गावातील गृहभेटी साठी ३ ते ७ मे पर्यंत दिवसातून ३ वेळा गावातील मतदारांच्या कुटुंबांना भेटी देऊन १०० % मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी कार्यरत राहणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांच्या मदतीसाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा,ग्रामपंचायत कर्मचारी , प्राथमिक शिक्षक, बचतगट ग्रामसंघ यांचा समावेश असेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago