महाराष्ट्र

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका): मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

मतदान केंद्रांवर द्यावयाच्या सुविधांबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांसमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच अन्य विभागप्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

मतदान केंद्रांवर उपलब्ध करावयाच्या पाळणाघरांमध्ये बालकांसाठी आहाराची सोय, पाणी, खेळणी यांच्या उपलब्धतेसह अंगणवाडी सेविका, सहाय्यक इ. यांनी उपस्थिती आवश्यक आहे. ही सगळी तयारी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि.१२ रोजी सायंकाळपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. त्याचा आढावा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी घेऊन तसा अहवाल जिल्हास्तरावर द्यावयाचा आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रत्येक पाळणाघरावर बालकांना द्यावयाचे पाणी तसेच अन्य आहार विषयक सुविधा उपलब्ध ठेवण्याविषयीही सुचना देण्यात आल्या. पाळणा घरातील तसेच मतदान केंद्रावरील अन्य सुविधांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले स्वतःचे मतदानही करावयाचे आहे. त्यादृष्टीने त्यांना एक अन्य सहकारी ही बदलीसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

23 तास ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago