Sonali Sood, Wife of Actor Sonu Sood, Injured in Road Accident on Samruddhi Highway
मुंबई : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा मुलगा यांच्यासह होती. सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली, पण सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात काल (२४ मार्च) घडला असून त्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सोनाली आणि तिचा भाचा दोघांनाही तातडीने नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ४८ ते ७२ तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहेत. ही बातमी कळताच, सोनू सूद ताबडतोब नागपूरला रवाना झाला. आज सकाळी सोनू सूद आपल्या पत्नीला भेटण्यासाठी नागपूरला पोहोचला.
सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते, ती सोनू सूदच्या सामाजिक कार्यांमध्ये मदत करते. सोनू सूद आणि सोनाली यांचा १९९६ मध्ये विवाह झाला. त्यांच्या दोन मुलांची नावे अयान व इशांत आहेत. सोनाली सूद तेलुगू भाषिक असून ती आंध्र प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. नागपूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सोनालीने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…