अर्थकारण

मोठी बातमी : करदात्यांना मोठा दिलासा, CBDT ने वाढवून दिली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत

नवी दिल्ली :  आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे.

प्राप्तिकर अधिनियम, १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवत असल्याचे अधिकृत पत्रकात म्हटले आहे. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अभूतपूर्व संकट निर्माण केलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने हा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकर विभागाने इतर अनेक करांच्या अनुपालनच्या मुदती आधीच वाढविलेल्या आहेत.

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची नवीन मुदत :

  1. एसएफटीची अंतिम मुदत ३० जून २०२१ करण्यात आली आहे.
  2. नियमित आणि सर्वसाधारण करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२१ वरून वाढवून आता ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.
  3. रिपोर्टेबल अकाउंट स्टेटमेंट दाखल करण्याची अंतिम मुदत ३० जून करण्यात आली आहे.
  4. आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीसाठी कराच्या डिडक्शनचे विवरण, 31 मे 2021 ऐवजी आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर केले जाऊ शकते.
  5. ऑडिट करणाऱ्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर ही असणार आहे.
  6. कराचा ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
  7. फॉर्म १६ इश्यू करण्याची अंतिम मुदत १५ जुलै करण्यात आली आहे.
  8. ट्रान्सफर प्राईसिंग स्टडी रिपोर्ट सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.
  9. विलंबित किंवा रिव्हाईझ्ड प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे.

नवीन ई-फायलिंग पोर्टल :

प्राप्तिकर विभागाने करांचे विवरणपत्र दाखल करण्यसाठी नवीन ई-फायलिंग पोर्टल, http://incometax.gov.in ची सुरूवात ७ जूनपासून करण्याची घोषणा केली आहे. सध्याचे पोर्टल करदात्यांना १ जून ते ६ जून या सहा दिवसांसाठी उपलब्ध असणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. नवीन ई-फायलिंग पोर्टल हे करदात्यांची सुविधा, सुलभपणे विवरणपत्र भरणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींचे उद्दिष्ट ठेवून सुरू करण्यात येणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago