young man murdered girl then raped with the dead body in prayagraj
प्रयागराज : एका विक्षिप्त तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची हत्या केली, त्यानंतर क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि तिच्या मृत शरीरावर बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज जिल्ह्यातील खेरी पोलिस स्टेशन परिसरातील डाबर गावात ही मुलगी राहत होती. ती आपल्या वहिनीच्या भावाच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी वहिनीच्या माहेरी भाईसोड या गावी गेली होती. मात्र, लग्नाच्या एक दिवस अगोदर 31 मे रोजी रात्री ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. दुसर्या दिवशी लग्न पार पडले, परंतु, या मुलीचा शोध लागला नाही. त्यामुळे तिच्या वहिनीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी हरवल्याची तक्रार दिली.
थरकाप! झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे कुत्र्याने तोडले लचके…
दुसर्या दिवशी म्हणजेच 2 जून रोजी पहाटे या मुलीचा मृतदेह गावातील तलावामध्ये तरंगताना आढळला. त्याबाबत कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांसह कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. कारण या मुलीचे तोंड व नाक दाबून तिची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपास आणि मोबाईल कॉल तपशीलांच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वहिनीचा भाऊ रोहिणी कुशवाह याला ताब्यात घेतले.
दरम्यान, मृत मुलीच्या भावांनीही पोलिसांना सांगितले होते की रोहिणी कुशवाह हा त्यांच्या बहिणीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. यामुळेच त्याचे लग्न देखील होत नव्हते. १ जून रोजी रोहिणीच्या धाकट्या भावाचे लग्न झाले होते. एसपी यमुनापार सौरभ दीक्षित यांनी सांगितले की, कॉल डिटेल्स आणि हत्येच्या ठिकाणी मिळालेले रोहिणी याचे लोकेशन या गोष्टी मिळाल्यानंतर त्यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
‘त्या’ तरुणांना पळता भुई थोडी… रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी दिला चोप
त्यानंतर पोलिसांनी रोहिणी याची कठोरपणे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की त्याचे अनेक वर्षांपासून या मुलीवर प्रेम होते. पण, ती लग्न करण्यास तयार नव्हती. घटनेच्या रात्रीसुद्धा त्याने तिला लग्न करणार की नाही याबद्दल विचारले, तेव्हा तिने नकार दिला. तिने सांगितले की ती कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात जाऊन कधीही लग्न करणार नाही. त्यानंतर आरोपी रोहिणी कुशवाह याने तोंड व नाक दाबून तिला ठार मारले. त्यानंतर त्याने या मुलीच्या मृतदेहावर बलात्कार केला. मग मृतदेह नेऊन तलावामध्ये फेकून दिला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…