ग्लोबल

महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना कोर्टाने सुनावली सात वर्षांची शिक्षा, फसवणूक केल्याप्रकरणी दोषी

दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील कोर्टाने महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्यांना 6.2 मिलियन रॅन्ड (आफ्रिकन चलन) म्हणजेच सुमारे ३.22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

वृत्तानुसार, 56 वर्षीय आशिष लता रामगोबिन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी उद्योगपती एस.आर. महाराजांची फसवणूक केली. एसआर महाराजांनी त्यांना भारतात उपस्थित असलेल्या वस्तूंसाठी (कंसाइनमेंट) आयात आणि सीमा शुल्क म्हणून 6.२ दशलक्ष रॅन्ड ऍडव्हान्समध्ये दिले होते. आशिष लता रामगोबिन यांनी त्या नफ्यामध्ये हिस्सा देण्याविषयी सांगितले होते.

आशिष लता रामगोबिन कोण आहेत?

आशिष लता रामगोबिन या सुप्रसिद्ध कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोविंद यांची मुलगी आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत स्थापन केलेल्या फिनिक्स सेटलमेंटला पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

2015 मध्ये लता रामगोबिन यांच्याविरूद्ध खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राष्ट्रीय फिर्यादी प्राधिकरणाचे (NPA) ब्रिगेडिअर हंगवानी मुलुदजी यांनी सांगितले होते की आशिष लता रामगोबिन यांनी संभाव्य गुंतवणूकदारांना बनावट पावत्या आणि कागदपत्रे दिली होती. ज्याद्वारे ती गुंतवणूकदारांना सांगत होती की तागाचे तीन कंटेनर भारतातून पाठवले जात आहेत.

एनपीएच्या प्रवक्त्या नताशा कारा यांनी सोमवारी सांगितले की, “लता रामगोबिन यांनी सांगितले होते की, मला आयात खर्च व सीमा शुल्क भरण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहेत, बंदरातील सामान खाली ​​करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती.” यानंतर लता रामगोबिन यांनी महाराजांना सांगितले की त्यांना 6.2 मिलियन रॅन्डची गरज आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित कागदपत्रे देखील दाखवली. त्यामध्ये वस्तूंच्या खरेदीशी संबंधित कागदपत्रे होती. एका महिन्यानंतर लता रामगोबिन यांनी एसआर महाराज यांना पुन्हा आणखी एक कागदपत्र पाठविले, जे नेटकेअर चालान होते, त्यामध्ये असे दिसून आले की माल वितरित झाला आहे, परंतु, पैसे मात्र दिले गेले नाहीत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago