क्राईम

भांडणानंतर पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा, मद्यधुंद अवस्थेत केले भयंकर कृत्य

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेचा पती दारू पिऊन आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर महिलेने पतीविरूद्ध महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांना महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी लेखी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री बारा वाजताच्या सुमारास तिचा नवरा दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर त्याने भांडण सुरू केले. त्याने मद्यधुंद अवस्थेत तिला घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्याने त्याच्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकला. या महिलेने तिच्या आई-वडिलांना आवाज दिला, पण कोणीही मदतीला आले नाही.

महिलेने पतीची हत्या करून दिरासोबत ठेवले अनैतिक संबंध, नंतर दिराची केली हत्या, त्यानंतर…

क्षेत्राधिकारी श्रीकांत प्रजापती यांनी सांगितले की महिलेने केलेल्या तक्रारीनंतर कसून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे निष्पन्न झाले. महिलेने तिच्या पतीवर मारहाण केल्याचा आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकल्याचा आरोप केला होता. पीडितेच्या तक्रारीनंतर तिचे मेडिकल करण्यात आले. त्यानंतर या दोघांनी वाद मिटवला. चौकशी केल्यानंतर हे पती-पत्नीमधील परस्पर वादाचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली आहे.

भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago