मनोरंजन

जामिनावर बाहेर आल्यानंतर करणने केला धक्कादायक खुलासा, निशावर केले आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहराला जामीन मंजूर झाला आहे. करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने करणविरोधात मारहाण व प्राणघातक हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. आता जामीन मिळाल्यानंतर करण बाहेर आला असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

करण म्हणाला कि, “हे सर्व लग्नानंतर इतक्या वर्षानंतर घडले याच खूप वाईट वाटतं आहे. बर्‍याच काळापासून नात्यात काही विचित्र गोष्टी घडत होत्या. एकमेकांपासून वेगळे होण्याविषयी चर्चा सुरु होती. हे सर्वकाही शांतपणे सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होतो.” करणने सांगितले की निशाचा भाऊही त्यांच्याशी चर्चा करत होता. काल निशाचा भाऊ त्याला भेटायला आला होता.

करणने आरोप केला की निशा आणि तिचा भाऊ यांनी घटस्फोटानंतर पोटगी म्हणून मागितलेली रक्कम खूप जास्त होती. ती रक्कम देणे मला शक्य नसल्याचं मी स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर रोहितने कायदेशीर मार्गाने जाण्याचे सुचविले. मग मीपण कायदेशीर मार्गानेच जाऊ, असे म्हणालो होतो. त्यानंतर मी माझ्या आईच्या खोलीत गेलो, मी माझ्या आईशी बोलत होतो, तेव्हा निशा बेडरूममध्ये आली आणि तिने माझ्या आईवडिल आणि भावाविषयी वाईट शब्दांचा वापर केला आणि त्यांना शिव्या दिल्या. त्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि त्यानंतर निशा माझ्यावर थुंकली. मी निशाला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला ‘मी काय करते ते पहा’ असे म्हणाली आणि बाहेर निघून गेली. तिने भिंतीवर स्वतःचे डोके आपटले आणि सगळ्यांना सांगितले की मी ते केले आहे, असा आरोप करणने निशावर केला आहे.

अभिनेता करण मेहराचा जामीन मंजूर, पत्नीने केला होता प्राणघातक हल्ल्याचा आरोप

करणने निशाच्या भावाने त्याला मारहाण केल्याचा देखील आरोप केला आहे. निशाच्या भावाने माझ्या कानशिलात लगावली आणि छातीवरही ठोसा मारला. करणने दावा केला की सत्य काय आहे हे पोलिसांनाही ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी काहीही केले नाही. जर त्यांनी खोटी केस केली, तर सत्य बाहेर येईल. उद्या जर चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल,” असे करण म्हणाला.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago