क्राईम

थरकाप..! नरभक्षी मुलाने आईची हत्या करून मृतदेहाचे केले १००० तुकडे, कुत्र्याबरोबर बसून खाल्ले…

स्पेन : स्पेनमध्ये एक अतिशय भयंकर घटना घडली आहे, जी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. एका नरभक्षी मुलाने आपल्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 1000 छोटे-छोटे तुकडे केले. ते तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि १५ दिवस ते खाल्ले. या राक्षसी क्रूर मुलाचे नाव अल्बर्टो सान्चेज गोमेझ (Alberto Sanchez Gomez) असे आहे. त्याने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे त्याच्या कुत्र्याबरोबर खाल्ले. स्थानिक कोर्टाने गोमेझला त्याची आई मारिया सोलेदाद गोमेझ हिच्या निर्दयी हत्येचा दोषी मानले आहे.

वृत्तानुसार, ही भयंकर घटना फेब्रुवारी 2019 मध्ये स्पेनच्या माद्रिद येथे घडली. या प्रकरणात बराच काळ कोर्टात सुनावणी सुरू होती आणि आता कोर्टाने 28 वर्षीय अल्बर्टो सांचेझ गोमेझ याला हत्येचा दोषी ठरवले आहे. तथापि, अद्याप त्याला शिक्षा सुनावलेली नाही, परंतु असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे की अल्बर्टोला 15 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकते. आरोपीने आपल्या बचावामध्ये असे म्हटले होते की आईची हत्या केली तेव्हा तो मनोरुग्ण होता. परंतु नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याचा हा दावा फेटाळून लावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्बर्टोने त्याच्या आईची गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने त्याच्या आईच्या मृतदेहाचे 1000 तुकडे केले आणि तो दोन आठवड्यांपर्यंत ते तुकडे खात होता. तपास अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की अल्बर्टोने त्याच्या आईच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तर हाडे घरातील ड्रॉवरमध्ये लपवून ठेवली होती. त्याच्या पलंगावर मारियाचे डोके, हात आणि हृदय सापडले.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टाला सांगितले की आरोपीने दावा केला होता की त्याने मृतदेहाचे काही भाग कच्चे खाल्ले, तर इतर भाग शिजवून खाल्ले होते. इतकेच नाही तर त्याने आपल्या पाळीव कुत्र्याला देखील मृतदेहाचे काही भाग खायला दिले. अल्बर्टो याने मृतदेह कापायला आरी आणि चाकू यांचा वापर केला होता. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोलिस अधिकाऱ्यांना देखील विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस इतका क्रूर कसा असू शकतो.

अल्बर्टोने स्वत: ला मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात युक्तिवाद केला होता की त्याला टीव्ही पाहत असताना आईला ठार मारण्याचा गुप्त संदेश मिळाला होता. त्याने असेही सांगितले की त्याने आईची हत्या केली हे त्याला आठवत नाही. तथापि, त्याचा हा युक्तिवाद यशस्वी झाला नाही आणि कोर्टाने त्याला हत्येचा दोषी ठरविले. फिर्यादीने या नरभक्षी मुलाला 15 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago