क्राईम

अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार, गुन्हेगारांमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश

हैदराबाद : मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. गुन्हेगारांमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तपास सुरु आहे. वृत्तानुसार, गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील पॉश एरिया ज्युबिली हिल्समध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्यात चार जणांचा सहभाग असून त्यापैकी एक आरोपी आमदाराचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आरोपीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिसांनी चार जणांविरुद्ध कलम ३५४,३२३ आयपीसी, ९,१० पॉक्सो कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आयपीसीचे कलम 376 देखील जोडले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडितेच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

ही घटना शनिवारी (२८ मे) घडली आहे. मुलगी पबमधून बाहेर पडत असताना तिथे तिला भेटलेले काही तरुण तिच्याजवळ आले आणि तिला घरी सोडण्याची ऑफर दिली. त्यानंतर हैदराबादमधील ज्युबली हिल्स एरियात मुलांनी कार पार्क केली आणि आळीपाळीने या मुलीवर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज बेंझ कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, ती कार आता जप्त करण्यात आली आहे. वाहन मालकाची चौकशी करण्यात येत आहे. पबमध्ये पार्टीत सहभागी झालेल्यांची आणि तिथे काम करणाऱ्या लोकांचीही पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावामुळे पोलिस ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago