क्राईम

अंधश्रद्धेच्या नावाखाली मौलानाकडून मुलीचा अमानुष छळ, मुलीचे मानसिक संतुलन बिघडले, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील एका गावात अंधश्रद्धेची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका मौलानाने अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत तिला बरे करण्याच्या नावाखाली क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. भूत काढण्याच्या नावाखाली आरोपीने तरुणीला बेदम मारहाण करून तिचा चेहरा, ओठ, हात अगरबत्तीने जाळले. या भयंकर वेदना सहन न झाल्याने या मुलीचे मानसिक संतुलन बिघडले. याप्रकरणी आरोपी मौलानावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, मुलीची प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांची तिला रुग्णालयात नेण्याची इच्छा होती. मात्र, मौलाना वाहिद याने तिला बरे करण्याचा दावा करत तिला आपल्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर उपचार सुरू केले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, वाहिदने अल्पवयीन मुलीला सतत चार दिवस घरी ठेवले आणि भयंकर वर्तन केले. भूत काढण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अमानुष मारहाण करून जळत्या अगरबत्तीने मुलीच्या तोंडावर, ओठावर आणि दोन्ही हातावर अनेक ठिकाणी वार केले.

दरम्यान, या शारीरिक व मानसिक छळामुळे पीडितेचे मानसिक संतुलन बिघडले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला सदर हॉस्पिटल चतरा येथे नेण्यात आले, तेथून तिला रांची येथील RIMS मध्ये रेफर करण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर पीडितेला मेंटल असायलममध्ये पाठवण्यात आले आहे. लोकांचे म्हणणे आहे की आरोपी मौलानांविरुद्ध कडक कारवाई झाली नाही तर वाहिदसारखे समाजात पसरलेले अनेक मौलाना आणि ढोंगी लोक अनेकांना आपला बळी बनवतील. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मौलानाला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago