Singer Tom Parker dies from brain tumor
ख्यातनाम ब्रिटिश-आयरीश बँड ‘द वाँडेड’ मधील गायक टॉम पार्कर याचं 33 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होता. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. परंतु बुधवारी (३० मार्च) अखेर टॉमचे निधन झाले. टॉमच्या मृत्यूच्या बातमीला त्याची पत्नी अभिनेत्री केल्सी हार्डवीकने सोशल मीडियावर पोस्ट करत दुजोरा दिला आहे.
केल्सीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “आम्ही अत्यंत दुःखी अंतःकरणानं सांगतो की, टॉमचं आज निधन झालं. त्याच्या अखेरच्या वेळी संपूर्ण कुटुंबीय त्याच्याबरोबर उपस्थित होते. टॉमच्या जाण्यानं आमचं हृदय विदीर्ण झालं आहे. टॉम आमच्या सगळ्यांच्या विश्वाच्या केंद्रस्थानी होता. त्याचं हास्य, त्यांचं उत्साही असणं याशिवाय आमचं आयुष्य कसं असेल याची कल्पना आम्ही करू शकत नाही.” टॉमच्या बँडमधील सदस्यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
टॉमच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलंदेखील आहे. टॉम आणि केल्सीचं लग्न २०१८ मध्ये झालं होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर, या जोडप्यााला मुलगी झाली. त्यानंतर २०२० मध्ये मुलाचा जन्म झाला. त्याचवेळी टॉमला ब्रेन ट्युमर असल्याचं निदान झालं होते. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती. परंतु अखेर आज त्याचे निधन झाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…