मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर समोर आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर चेंबूर येथील त्याच्या घरी असताना शुक्रवारी दुपारी त्याला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर प्रभाकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
प्रभाकर साईल कोण आहे ?
प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हा किरण प्रकाश गोसावी यांचा बॉडीगार्ड होता. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावी यांनी त्याला सांगितलं होतं. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमलं. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल करत अनेक धक्कादायक खुलासे केले. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं फोनवरील संभाषण मी ऐकलं होतं, असं त्याने सांगितलं होतं.
आर्यनला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितले होते. यापैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला होता. प्रभाकर साईल हा एनसीबीचा पंच होता. त्याने आर्यन खान ड्रग्स प्रकरणात साक्ष दिली होती. पण, साक्ष नोंदवताना कोऱ्या कागदावर सही घेण्यात आली, असा आरोप त्याने केला होता. क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर गोसावी यांनी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याने केला होता.
2 ऑक्टोबर 2021 रोजी समुद्राच्या मध्ये गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकून एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी आतापर्यंत आर्यनसह एकूण 20 जणांना अटक करण्यात आली.
प्रभाकर साईलचा मृतदेह आज सकाळी त्याच्या घरी आणला जाईल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…