क्राईम

शरीरसंबंधास नकार दिल्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या, १५ महिन्यांच्या बाळासह तीनही मुलांना कालव्यात फेकलं

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका 37 वर्षीय व्यक्तीने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मागील 15 दिवसांपासून पत्नी शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिच्यावर गोळी झाडली. याशिवाय आरोपीने आपल्या तीन मुलांनाही कालव्यात फेकले.

पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले कि, “पत्नी पंधरा दिवसांपासून संबंध ठेवत नव्हती. रात्री निर्णय घेतला की जर तिने सकाळी ऐकले नाही तर तिला ठार मारेल. सकाळी पुन्हा तसाच प्रकार घडला, पत्नीने जवळ येण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली.” पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. त्याला वाटले की पत्नीनंतर या मुलांना कोण सांभाळेन? असा विचार करून त्याने सानिया, वंश आणि हर्षिता या तीन मुलांना कालव्यात फेकून दिले. हर्षिताचे वय केवळ 15 महिने आहे.

स्थानिक लोकांनी पोलिसांना घटनेविषयी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पप्पूला अटक केली. कालव्यात फेकलेल्या मुलांचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप मुलांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. पप्पूला तुरूंगात पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago