The little girl died when her father hit her hard
नागपूर : मला मुलगी हवी होती, तू मुलगा जन्माला घातला असे म्हणत मद्यपी बापाने एक वर्षीय मुलाची हत्या केली आहे. या आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती (1 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भजन कौरती हा काल संध्याकाळी दारूच्या नशेत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि पुन्हा दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागितले. मात्र त्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याला राग अनावर झाला. त्याने मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिला, असं म्हणत भांडण सुरु केलं. त्यानंतर त्याने एक वर्षाच्या सत्यमला उचलून अंगणातील दगडावर फेकलं. यात सत्यमच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…