क्राईम

खळबळजनक : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

यवतमाळ : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. यवतमाळमधील उमरखेड शहरात ही घडली आहे. शेख नजीर शेख उस्मान (५० वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव असून तो अद्यापही फरार आहे. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख नजीर शेख उस्मान याचा दूध व्यवसाय आहे. पीडित मुलगी दूध आणण्यासाठी शेख नजीर शेख उस्मानच्या गोठ्यात गेली होती. त्यावेळी त्याने आमिष दाखवून तिला जवळ बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले.

पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी (२६ मे) सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी आरोपींना अटक करू, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान, येत्या तीन दिवसात आरोपीला अटक न झाल्यास उमरखेड पोलिस ठाण्यासमोर वार्डातील नागरिकांसह उपोषणाला बसू, असा इशारा एमआयएमचे नगरसेवक अफसरभाई जलील कुरेशी यांनी दिला आहे.

भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या

ज्याला मृत समजून अंत्यसंस्कार केले, ‘तो’ नऊ दिवसांनी जिवंत परतला, मात्र भूत समजून…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago