Angry brother shoot his sister when return home after run away with boyfriend
उत्तर प्रदेश : एका तरुणाने आपल्या बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. मेरठ जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची बहिण तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती, त्यामुळे तो खूप चिडलेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील सरधना भागातील छूर गावात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचे गौरव नावाच्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ती या तरुणाबरोबर घरातून पळून गेली होती. पण त्यानंतर दुसर्याच दिवशी ती घरी परत आली. परंतु, बहीण घरातून पळून गेल्याचा राग डोक्यात असल्यामुळे भावाने तिला बघताक्षणीच तिची गोळ्या घालून हत्या केली.
भयंकर! महिलेने मुलांना खोलीच्या बाहेर काढून नवऱ्यावर केला हल्ला.. नंतर केलं असं काही…
मेरठ पोलिसांनी सांगितले की, 13 जून रोजी ही मुलगी आणि गौरव घरातून पळून गेले होते. त्यानंतर 14 जूनला ही मुलगी घरी परतली. मुलीच्या पळून जाण्यामुळे तिचा भाऊ शेखर खूप रागावला होता. त्यामुळे शेखरने आपल्या बहिणीला गोळ्या घालून ठार केले. मात्र, कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच शेखर तेथून पसार झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे.
भीषण अपघात! ट्रकचालक करत होता ओरल सेक्स, एका महिलेचा मृत्यू तर…
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…