तंत्रज्ञान

Apple वॉच सीरीज 6 लॉन्च हे आहेत फिचर्स

Apple Watch Series 6 : ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक करणारे Apple चे वॉच सीरीज 6 भारतीय बाजारात  आहे. व्हेरिएंटची (GPS) किंमत 40,900 रुपये आणि (GPS+Cellular) मॉडल 49,900 रुपये आहे. शुक्रवारपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

खास फिचर :

या वॉचमधील खास फिचर म्हणजे, यात देण्यात आलेलं ह्यूमन ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक फिचर.

  1. A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. सोलो लूप्स डिझाइन असणारं हे वॉच यूजर फ्रेंडली आहे आणि अगदी सहज मनगटावर फिट होतं.
  2. Memoji सपोर्ट आहे. म्हणजेच, यूजर्स iMessage app मार्फत Memoji एकमेकांना पाठवू शकतात.
  3. watchOS 7 ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित असणार आहे.
  4. Fitness+ सर्विसचाही समावेश करण्यात आला आहे. जी तुम्हाला फिटनेसबाबत सतर्क करणार आहे. यामार्फत यूजर्स वर्कआऊट सेशन्समध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. यामार्फत डेली वर्कआऊटला ट्रॅक केलं जाऊ शकतं. या सर्व्हिसचा वापर करण्यासाठी काही पॅकेजेस आहेत. ज्यामध्ये मंथली $9.99 आणि एका वर्षासाठी $ 79.99 मोजावे लागणार आहेत. कस्टमर्सना 3 महिन्यांसाठी Apple Fitness+ सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.
  5. तुम्ही याचा वापर प्रखर उन्हातही करू शकणार आहात. हे वॉच राउंड डायलसोबत युजर्सना मिळणार आहे. दिसायला Apple वॉच सीरीज 5 प्रमाणेच आहे.
  6. 6 रंगांच्या स्ट्रॅप्स उपलब्ध असणार आहेत.
  7. ब्लड ऑक्सिजनबाबत फक्त 15 सेकंदात माहिती मिळते. कोरोना संसर्गात वॉचमध्ये देण्यात आलेलं ऑक्सिजन सेंसर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे.
  8. सीरीज 5 च्या तुलनेत हे वॉच 15 टक्के फास्ट काम करणार आहे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago