क्रीडा

आयपीएलच्या इतिहासातील मोठे रेकॉर्ड, ‘या’ संघाने केल्या सर्वाधिक धावा तर ‘या’ खेळाडूने नोंदवला सर्वाधिक धावांचा विक्रम..

इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मानली जाते. जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा चाहते नवीन रेकॉर्डचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनसमोर बसून राहतात आणि दुसरीकडे यातून क्रिकेटमध्ये नवीन स्टार खेळाडू उदयास येतात. आयपीएलमध्ये टी-२० स्वरूपाच्या या खेळात अनेक विक्रम झाले आणि ते मोडताने देखील आपण पाहिले आहेत. 23 एप्रिल २०१३ रोजी दोन मोठे रेकॉर्ड  नोंदवले गेले आहेत. आजही ते कायम आहेत.

आयपीएलच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत?
आयपीएलमध्ये 23 एप्रिल 2013 रोजी बेंगळुरू येथे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा नोंदविण्यात आल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सहारा पुणे वॉरियर्स यांच्यात हा सामना झाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 263/5 धावांची नोंद केली आणि आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदविला. या सामन्यात ख्रिस गेल याने  66 चेंडूंत नाबाद १७५ धावा केल्या. ख्रिस गेलने १३ फोर आणि १७ सिक्स लगावले होते. त्यात त्याचा स्ट्राइक रेट 265.15 होता. सहारा पुणे वॉरियर्सने  २० षटकांत केवळ १33 धावा केल्या होत्या. ख्रिस गेल १७५ धावाकरत सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग?
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग IPL २०२० मध्ये झाला होता. IPL २०२० चा 9 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 27 सप्टेंबर 2020 रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. यात पंजाब किंग्जने 223 धावांची नोंद केली. मयंक अग्रवालने 50 चेंडूत 106 धावांचे शानदार शतक झळकावले.

त्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत ३ चेंडू शिल्लक असतानाच टार्गेट पूर्ण करून सामना जिंकला. त्यात संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथने प्रत्येकी 85 धावा आणि 50 धावा केल्या. राहुल तेवतियाने 31 चेंडूत 53 धावा करून डाव पुढे नेला तर जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्सकडून दोन षटकार ठोकत खेळ संपविला. संजू सॅमसनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago