क्रीडा

MI vs CSK IPL 2021 : रोमहर्षक! मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर थरारक विजय, पोलार्डची वादळी खेळी

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने धावांचा पाऊस पाडत मुंबई इंडियन्सनंसला २१८ धावांचं कडवं दिल. मुंबई इंडियन्सनं ते आव्हान ४ विकेट राखून गाठलं. कायरन पोलार्डनं वादळी खेळी करत अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्स संघासाठी विजय खेचून आणला. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं आजपर्यंत दोनशे धावांच्यावरील आव्हान गाठण्यात कधीच यश आलं नव्हतं. पण आज कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे ते शक्य झालं.

दिल्लीतील अरुण जेटली मैदानात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या जोडीने 71 धावांची खेळी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सुर्यकुमार अवघ्या 3 धावांची भर घालून फिरला. कायरन पोलार्डने 34 चेंडूतील 87 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 219 धावांचं कडवं आव्हान पार कारण संख्या झालं. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात मुंबईला 16 धावांची गरज होती. एनिग्डीच्या गोलंदाजीत 16 धावा करुन पोलार्डने संघाला विजय मिळवून दिला.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये बोल्टने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिलाय. ऋतूराज गायकवाड अवघ्या 4 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर फाफ ड्युप्लेसी आणि मोईन अली या जोडीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. बुमराहने मोईन अलीच्या रुपात मुंबई इंडियन्सला दुसरे यश मिळवून दिले. पोलार्डने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ ड्युप्लेसीसह रैनाची विकेट घेतली. त्यानंतर रायडू आणि रविंद्र जडेजाने मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रायडूने 27 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने 72 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला जडेजाने 22 चेंडूत 22 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी केलेल्या 102 धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्डजने 4 गड्यांच्या मोबदल्यात 218 धावा केल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

13 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago