क्रीडा

IND vs PAK T20 : आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना

IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.

भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवण्याची पाकिस्तानकडे संधी आहे.

आयपीएलच्या फेज-2 मधील सामन्यांच्या आधारावर बघितले तर दुबईच्या खेळपट्टीवर 150 ते 170 धावा केल्या जातात. फेज-2 मध्ये येथे 13 सामने खेळले गेले. यापैकी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 सामने जिंकले. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ 4 सामन्यांमध्ये विजय मिळाला. या दृष्टीने भारत-पाकिस्तान सामन्यात नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देऊ शकतो.

या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाकडे बोट दाखवणारा कोणताही मोठा पैलू नाही. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग पाचवेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारतीय संघाने पाकिस्तानपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago