after 14 years matchbox price revised now available in 2 rupees per unit from december 1
पुणे : काडीपेटी आता एक रुपयात मिळणार नाही. आता काडीपेटीला महागाईचा चटका बसला असून तब्बल १४ वर्षांनंतर त्याचे भाव वाढणार आहेत.
देशातील मुख्य काडीपेटी उद्योग शिवकाशीमध्ये चालतो. काडीपेटी उद्योगात गुंतलेल्या 5 मोठ्या कंपन्यांनी आता महागाईशी झुंज देत काडीपेटीची किंमत वाढवण्यास सहमती दर्शविली आहे. वृत्तानुसार देशभरात अवघ्या 1 रुपयात उपलब्ध असलेला माचिस बॉक्स 1 डिसेंबरपासून 2 रुपयांना मिळेल.
काडीपेटीची किंमत यापूर्वी 2007 साली वाढवण्यात आली होती. त्यानंतर 50 पैशांची काडीपेटी १ रुपयाला झाली होती. शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसने तब्बल 14 वर्षांनंतर काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅचबॉक्स उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी म्हणतात की माचिस तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाशी संबंधित 14 वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. माचिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल फॉस्फरसचा दर ४२५ रुपयांवरून ८१० रुपये किलो झाला आहे. मेणाची किंमत 58 रुपयांवरून 80 रुपये झाली आहे, तर माचिसच्या डबीची किंमत 36 रुपयांवरून 55 रुपये झाली आहे. याशिवाय कागद, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फेटच्या किमतीही १० ऑक्टोबरपासून सातत्याने वाढत आहेत. वरून डिझेलच्या किंमतीचा भार वेगळाच आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…